Back to School मोहिमेच्या अंतर्गत पुन्हा एकदा
शाळेत जाण्याचा योग आला. मोहीमच म्हणावी लागेल कारण तब्बल १७ वर्षांनी सगळ्यांना शोधून
काढायचे म्हणजे तारे वरची कसरतच, पण इंटरनेट, सोशल नेटवर्किंग यामुळे कष्ट थोडे कमी
पडले.
शिकवण्यात बाईंनी काहीच कमतरता ठेवली नसावी
कदाचित आमची ग्रहण करायची क्षमताच तोकडी पडली असेल. शाळेत अभ्यासाचे धडे गिरवले पण
प्रॅक्टिकल जगात आल्यावर शिक्षणाच्या महत्वाची जाणीव झाली. काही बदल झाले म्हणजे शाळेची जागा
आता ऑफिस ने घेतली, बाईंची जागा बॉस ने, बेरजेचे रुपांतर प्रॉफिट मध्ये तर वजाबाकी
लॉस झाली, रिझल्टची टक्केवारी बलन्सशिटच्या कागदावर उमटवायला वेळेच्या गणिताची
प्रक्टीकॅल सुरु झाली. चटणी पाव आता बर्गर झाला, पुरणपोळी पिझ्झा बनली, पोटापेक्षा
चवीचा विचार जास्त करतोय, भविष्यकाळ सेव्हिंग करतोय तर वर्तमानकाळ प्रवासात उडतोय,
भूतकाळ तर Ctrl - Alt - Del
च्या मार्गावर चालतोय.
काल परवा लहान असणारे सारेच आता मोठे झालो अर्थात वयानेच, ज्याने त्याने प्रतिष्ठा, पैसा, अनुभव मिळवले पण परिस्थिती तीच राहिली ग्लास अर्धा भरलेला कि ग्लास अर्धा रिकामा (अर्धेच असले तरी ग्लासमध्ये पाणीच आहे असे समजा दुसरे काही नाही) शाळेच्या बाहेर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे सगळे जण एकाच विचार करतात "त्याने आपल्याला काय दिले" कधी हा विचार केला तर "आपण त्यांना काय दिले" शाळेतली निरागसता त्या मैदानातल्या लाल मातीतच राहिली असे वाटते पण हे चालायचेच.
एवढे वर्षांत शाळा देखील बदलली नवीन इमारत, कॉम्पुटर रूम, ई-ऎज्युकेशन, प्रयोगशाळा, ग्रंथालय, विशेष म्हणजे विविध खेळांत शाळेतल्या विद्यार्थ्यांचा सहभाग आणि त्याला शाळेचा मिळणारा सपोर्ट उलेखनीय आहे आमच्यावेळी हे सगळा नव्हत. आता नवीन मित्र आहेत प्रचंड नाही पण दोन वेळचे मिळेल एवढी कमाई सुद्धा आहे पण शाळेतल कोणी भेटला कि थोडा आपले पणा वाटतो, टोपण नावाने चिडवायला विचार करावा नाही लागत, उणीदुणी काढताना कसली भीती नाही वाटत.
काल परवा लहान असणारे सारेच आता मोठे झालो अर्थात वयानेच, ज्याने त्याने प्रतिष्ठा, पैसा, अनुभव मिळवले पण परिस्थिती तीच राहिली ग्लास अर्धा भरलेला कि ग्लास अर्धा रिकामा (अर्धेच असले तरी ग्लासमध्ये पाणीच आहे असे समजा दुसरे काही नाही) शाळेच्या बाहेर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे सगळे जण एकाच विचार करतात "त्याने आपल्याला काय दिले" कधी हा विचार केला तर "आपण त्यांना काय दिले" शाळेतली निरागसता त्या मैदानातल्या लाल मातीतच राहिली असे वाटते पण हे चालायचेच.
एवढे वर्षांत शाळा देखील बदलली नवीन इमारत, कॉम्पुटर रूम, ई-ऎज्युकेशन, प्रयोगशाळा, ग्रंथालय, विशेष म्हणजे विविध खेळांत शाळेतल्या विद्यार्थ्यांचा सहभाग आणि त्याला शाळेचा मिळणारा सपोर्ट उलेखनीय आहे आमच्यावेळी हे सगळा नव्हत. आता नवीन मित्र आहेत प्रचंड नाही पण दोन वेळचे मिळेल एवढी कमाई सुद्धा आहे पण शाळेतल कोणी भेटला कि थोडा आपले पणा वाटतो, टोपण नावाने चिडवायला विचार करावा नाही लागत, उणीदुणी काढताना कसली भीती नाही वाटत.
नवीन प्रयोगशाळा
ई-ऎज्युकेशन
कॉम्पुटर रूम
गृहपाठ न केल्याने वर्तक बाईंनी वर्गा बाहेर
ओणवे उभे करावे आणि त्याच वेळी दुसऱ्या वर्गात जाणाऱ्या मोहिते बाईंचा आवाज "तू आज पण बाहेरच का?" "नर्मदेतल्या गोट्यांना" आकार देणाऱ्या गाजरे बाई आज
देखील बोलायला लागल्यावर तेवढाच धाक वाटतो. गमरे बाईंनी A - B -
C - D
ची घेतलेली उजळणी, नाईक सरांचे सायन्स, पिंपळे सरांचे P. T. चे तास, सरांबरोबरचा एक किस्सा अजून आठवतो आहे. मधल्या सुट्टीला लागून ऑफ पिरिएडला आलेला तेव्हा काही बॅट - बॉल घेऊन पद्धतशीर क्रिकेट असं कधी क्वचितच व्हायचा यावर उपाय म्हणून आम्ही ताडाची झावळी व्यवस्तीत तोडून त्याचा बॅट म्हणून वापर करायचो. बॉलसाठी लागणारे ३ रुपये जमवायला साधारण ४ - ५ जणांच्या वाटणीचा चटणी - पाव रद्ध व्हायचा. त्यादिवशी देखील ताडाच्या झावळीची बॅट हातात घेऊन सज्ज असणारा पालकर आणि पैसे जमा करून आणलेला कवटी बॉल घेऊन बॉलिंग करणारा मी, लाल मातीचे मैदान म्हणून बॉल सरळ बॅटवर टाकावा लागायचा, पहिलाच चेंडू टाकला आणि डावखुऱ्या पालकर ने थेट त्याला शिशु वर्गाच्या पत्र्यांवर पोहोचवला, झाले आता पुढचा संपूर्ण तास काय करायचे ह्यावर आणि माझ्या बॉलिंगच्या क्लासवर चांगलीच स्तुती झाली, पण मुख्य प्रश्न होताच नंतरचा तास काय करायचे. सगळ्यांचे मत पडले पालकर ने जाऊन बॉल आणावा आणि त्याला योग्य ती मदत मी करावी. मी आणि पाल्या दोघे शिशुवर्गाच्या एक बाजूला आलो तिकडून विटांचे बांधकाम जरा खडबडीत होते. माझ्या हातावर पायठेवत पाल्या कसाबसा पत्र्यावर चढला, आमचा बॉल होता एकदम शेवटच्या टोकाला तिकडे जाई पर्यंत त्याला बरेच जणांनी पाहिलं आणि त्यांचे अडकलेले चेंडू मागायला सुरवात झाली, आता आलोच आहे तर देतो ह्या कर्मधर्माने त्याने देखील द्यायला सुरवात केली. हा सगळं आरडाओरडा व्हॉलेंटिअर असणाऱ्या "तळेकर" ने पहिला आणि सुमितला पकडून पिंपळे सरांसमोर उभा केला. चांगलेच धोपट काम झाले आणि आता पाल्याची सुटका होणार तेवढ्यात कोणी तरी पाचकल, सर हा एकटा वर कसा चढेल अजून कोणी मदत केली असणार झाला उभ्या पट्टीचे ३० एक फटके १०० दीडशे उठाबश्या झाल्यावर त्याचा सुद्धा संयम सुटला आणि मैदानाच्या शेवटच्या टोकाला आमच्या घोळक्या मधून ते थेट वर्गापर्यंत माझी देखील वरात निघाली, नंतर जो चोपला आहे तो मार अजून देखील लक्षात आहे.
१९९८-१९९९ ला दहावीची परीक्षा संपली आणि
शाळेचा राम राम घेतला. (मी नाही इतरांनी माझी ऑक्टोबर - मार्च वारी तब्बल २००४
पर्यंत चालली) शाळेच पर्व संपल आणि सगळे जगाच्या पाठीवर आपला ठसा उमटवायला इकडे
तिकडे विखुरले साधारण पाच वर्षांनी मी, सुशील साखरे, संदेश आवेरे आणि सुमित पालकर
पुन्हा संपर्कात आलो आणि अजूनही आहोत शाळेत Just Friends असणारे आम्ही प्रक्टिकल जगात मात्र चांगले
मित्र बनलो. तस चौघांच क्षेत्र एकदम वेगळ "संदेश" वडिलांचा प्रिंटींगचा
बिझनेस सांभाळतोय. ह्याला शाळेत जस पहिल आहे आणि आज जे पाहतो त्यावरून एकाच म्हणता
येते "मराठी माणसाला बिझनेस करता येतो अगदी गुजराती माणसा प्रमाणे",
शाळेतल्या पुस्तकांन व्यतिरिक्त अजूनही पुस्तकांतून ज्ञान मिळते ह्याचे धडे
आम्हाला "पालकर" गुरुजींच्या तासाला मिळाले, हा तास मधल्या सुट्टीत
वडाच्या झाडाखाली भरायचा पण शाळेतला सगळ्यात टारगट म्हणवला जाणारा हा विद्यार्थी HDFC बँकेत चांगला Manager पदावर आहे. आणि आता
हे महाशय एकदम व्हाईट कॉलर बनले आहेत, हा इतका सुधारला कि आम्ही रस्त्याने जाताना
मस्ती केली तरी "अरे हे काय करताय, वेडे आहेत तुम्ही!' असले शब्द वापरतो.
शाळेची पहिली इमारत
पालकर सरांची मधल्यासुट्टीतील शाळा ह्याच वाडाखाली भरायची
"सुशील सुदाम साखरे" हे जरा वेगळच रसायन म्हणजे अख्या वर्गात शाळा
संपल्यावर काय करायचं हे फक्त ह्यालाच माहित होता, सायन्सला गेला पुढे IIT मुंबई मधून M-Tech केले.
(ह्याच्या IIT मध्ये असण्याचा आम्ही तिघांनी भरपूर फायदा
उचलला, शनिवारी हॉस्टेलवर राहायला जायचे आणि थेट रविवार सकाळचा नाश्ता तिकडे करूनच निघायचे.) पुढे तो बंगलोर - दिल्ली असा करत आज बेल्जिअमला एका नामांकित कंपनीत Scientist म्हणून काम करतो, विशेष म्हणजे SRAM (Static Random-Access-Memory) चे Patent त्याने २०१२ साली file केले आहे. (http://www.google.com/patents/US20140029333) लिंक पहा. पार
अमेरिकेत bit-cell
ह्या विषयावर Lecture
सुद्धा देऊन आला आहे. यंदाच्या आधुनिक जगात What's UP, Facebook च्या माध्यमातून
बरेच जण एकत्र आलो "विनोद सावंत" हा Back Bencher's प्रकारात मोडणारा आज
इमारतींचे 3D Visualisation
करतो. आमच्या What's
UP
ग्रुपचे Admin
"विवेक विधाते" हा देखील IT मध्ये नामांकित कंपनीत कामाला आहे. "विनया"
वकील बनेल हे आम्हाला शाळेतच समजले होते. "अनुपमा" घर घ्यायला लोन देते
तर "अनिता" BMC मध्ये आणि "रघुनाथ गवांडे"
रेल्वेमध्ये सरकारच्या सातव्या वेतन आयोगाची वाट पाहतात आहे. तसा मला लिहायचा
शाळेपासूनच कंटाळा नाही तर लिहायला नाव आणि त्यांची कर्तुत्व अजूनही आहे. शाळेतली
दंगामस्ती लिहायला लागलो तर पुस्तकच बनेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा