२०१३ वर्ष सरत आले …… मनात विचार आला काय दिले या वर्षाने? प्रश्न तर मोठा
आहे पण माझ्या कडे पण संपूर्ण रात्र पडली आहेच मग एक एक करत सगळे आठवू लागले
आणि उत्तर पण मिळाले या वर्षाने दिल्या आठवणी! नेहमी सारख्या…. आयुष्य म्हणजे काय नक्की आठवणीच काय? मग आठवण
म्हणजे काय????????????
आठवण म्हणजे सांधणची दरी: - बोचरी
थंडी, शेकोटी, सोबतीला गाणी, मस्त जेवण आणि चांदणे
पांघरून झोपणे
आठवण म्हणजे भैरमगड: - हरवलेली वाट, घशाला पडलेली कोरड आणि
मावळतीला जाणारा सुर्य
आठवण म्हणजे हरिश्चंद्रगड: - नळीची वाट, कोंकणकडा, आणि मी पाहिलेला
सूर्यास्त
आठवण म्हणजे प्रबळगड: - रणरणत्या उन्हात झाडाची सावली,
संपलेल्या पाण्याच्या बाटल्या, आणि
टाकीतले थंडगार पाणी
आठवण म्हणजे चंदेरी: - पाठीवेरची जड बॅग सांभाळत रात्रीच्या
अंधारात चालणे आणि
वेळीच साधलेले प्रसंगासावधान
आठवण म्हणजे गणपती गडाड:- संपूर्ण दिवस धबधब्याखाली भिजणे, गरमा
गरम जेवण आणि
देवळातील शांत झोप........
आठवण म्हणजे कात्रज ते सिंहगड:- लचकलेला
पाय, मित्रांनी दिलेली साथ आणि
गरमा गरम कांदाभजी ………….
आठवण म्हणजे भीमाशंकर: - निसर्गरम्य
वातावरण, शिडीघाट आणि गाण्याच्या भेंड्या………….
आठवण म्हणजे वासोटा: - सुर्यालाही
रोखणारे घनदाट वन आणि कोयनेचे शांत निर्मल पात्र…….
आठवण म्हणजे लिंगाणा: - गवताचा
गालीचा, चांदणी रात्र, आणि प्रौढप्रतापपुरंदरला दिलेली आरोळी …………
आठवण म्हणजे मुंबई: - सांजवेळ,
मरीन ड्रायइव्ह, आणि ती ……………… (अजून पण ती कोण हा प्रश्न अनुत्तरीत!)
आठवण म्हणजे आता आठवण हेच आयुष्य झाले आहे ………… मग आयुष्य म्हणजे?
आयुष्य म्हणजे आई: - नेहमी घराबाहेर राहतो म्हणून ओरडणारी
पण सांभाळून या सगळ्यांनी न चुकता बोलणारी आणि रात्री अपरात्री पण जेवण
वाढायला स्वतःची झोप मोड करणारी
आयुष्य म्हणजे महाराष्ट्र: - संतांची
भूमी, समर भूमी, माझी भूमी ………….
आयुष्य म्हणजे शिवराय: - जगावे
कसे हे शिकवणारे....
आयुष्य म्हणजे शंभूराजे: - धैर्य, साहस, स्वाभिमान …………
आयुष्य म्हणजे जिजाऊ:- मायेचा
सागर……………..
आयुष्य म्हणजे मित्र: - नेहमी
साथ देणारे……………..
आयुष्य म्हणजे माझा सखा सह्याद्री……………..



