वैराग्य, आध्यात्म आणि
समर्पण विश्लेषणांच्या अनेक छटा पहायचा योग देहूला आला, गाऱ्हाणे म्हणून
उदरभरण करणाऱ्या "वासुदेव" रुपी ह्या अवलियाची भेट पर्वणीच ठरली
इंद्रायणीच्या काठावर त्यांच्या हातात वडापाव देताच माझे नाव विचारून काही
गाऱ्हाणे म्हणायला सुरवात केली आणि मी त्यांना मधेच प्रश्न केला हे तुकाराम
महाराजांचे गावात पण काही मंदिर आहे का? खरे तर ते असे गाऱ्हाणे म्हणणे प्रकार मला
आवडत नाही. मी संतांना देव मानत नाही कारण देव आहे कि नाही हे माहीतच नाही पण संत
होते, आहेत, अजूनही होतील (पैसा घेऊन प्रवचन करणारे वेगळे) त्यांच्या विचारांचा
भंडारा अवघ्या महाराष्ट्र भर पसरला आहे. आहो "संतांची भूमी" हि,
त्यांच्या विचारांचे आचरण केले तरी खूप ………… हातातल्या खाण्याचा एक घास गिळंकृत
करून एका वेगळ्या टोन मध्ये थोडासा घोगरा आवाज आला.
होय हेच तुकाराम महाराजांचे गाव देहू,
वाण्याच पोर विठ्ठलाच्या भक्तीत असं गुंगल कि भक्तीची परिभाषाच बदलली. पार
ज्ञानेश्वर महाराजांच्या पठडीत जाऊन बसल. "पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री
ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, जगदगुरु तुकाराम महाराज की जय" असा
जयघोष करतो ना आपण. तस पाहता वडिलोपार्जित सावकारी होती पण दुष्काळ आला आणि
तुकोबांनी वैराग्याला आलिंगन देत आपलं समाजाचा देण चुकता केल. "आम्हा घरी धन
शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे यत्न करूं" (त्यांनी उच्चारलेले हे शब्द
माझ्या लक्षात राहण्या सारखे नव्हते म्हणून मोबाईल मध्ये लिहून ठेवले होते.)
शब्दांनाच आपले धन आणि शस्त्र मानत त्यांनी समाजाला बरेच मार्गदर्शन
केले, जातीभेदावर परखड काव्ये केली, आध्यात्म आणि विठ्ठल अभंग
रुपात असा काही गायला कि वाङ्मय रुपी लेखनाला मंत्रांचे पावित्र्य लाभले.
महाराष्ट्राच्या हृदयात हा गोड काव्य वारसा असा काही भिनला कि भाषेची रसाळता
अतुलनीय झाली.
पाण्याची
बाटली पुढे केली तसे दोन घोट घेत आमच्या संभाषणाला पुन्हा सुरवात झाली. विठ्ठलाचे
थोर भक्त होते म्हणून त्यांचे मंदिर नाही बांधले …… हालअपेष्टांचे उतार चढाव
त्यांना तरी कुठे चुकले आहेत. लहान वयात आई-वडिलांच्या मायेला पारखे झाले, मोठा
भाऊ संन्यासी झाला, दुष्काळाने मोठा मुलगा हिरावून घेतला. महाजनकी बुडाली, गुर-ढोर
गेली, संसारातील उदासीन मनाने विठ्ठलाच्या भक्तीत मात्र भरच टाकली भंडारा डोंगरावर
चिरंतनाचा सक्षात्कार शोधायला गेले असता साक्षात विठ्ठलानेच दर्शन दिले असे
मानतात. विठ्ठल भक्तीचा वारसा पार विश्वंभरबुवांपासूनच चालत आला आहे ह्याच्या
घराण्यात.
विश्वंभरबुवा
म्हणजे? माझा प्रश्न. विश्वंभरबुवा म्हणजे तुकोबांच्या वंशावळीचे प्रथम व्यक्ती,
अगदी सुरवातीचा माणूस "मूळपुरुष". वंशावळी म्हणजे आपल्या ………होय महाराज
ते माहित आहे मला “आपल्या जन्माचा वृक्ष ज्याच्या पासून सुरु होतो ती व्यक्ती.”
चेहऱ्याची सुरकुती सुद्धा न हलवता त्यांनी उरलेला घास संपवला थोडे पाणी पिउन झाले.
अनंत, अथांग विठ्ठलभक्ती वाणीतच नव्हती तर अन्तःकरणात वास करून होती. वैराग्याच्या
कसोटीला अत्मानुभावाचा शाब्दिक रंग आहेच पण त्यांचा ज्ञानेश्र्वरी, वेद, पुराणांचा
अभ्यास देखील होता. तुकोबांची भक्ती अंधश्रद्धाळू नव्हती हे त्यांच्या कर्मठपणा व
अंधश्रद्धेवर प्रहार; दांभिक-पाखंडी-खोट्या साधूंवर टीका; विशुद्ध पारमार्थिक जीवन
जगण्यासाठीची सूत्रे इत्यादी अनेक अभंगांतून स्पष्ट होते.
“जे का रंजले गांजले। त्यांसी म्हणे जो आपुले।। तोचि साधू ओळखावा।
देव तेथेचि जाणावा।।“
बुआ
तुकोबांचे आत्मचरित्र कथन करता करता थोडे थांबले. आज सुर्य नारायणाने माझ्यावर जरा
मेहरबानीच केली होती, सकाळी घरातून बाहेर पडल्या पासून आता पर्यंत अधेमधेच ढगा
अडून डोकावत होता. दुपारच्या प्रहरी इंद्रायणीकाठी गार वाऱ्याची
झुळूक शरीराला आणि बुवांचे बोल मनाला सुखावातच होते. तसा अध्यात्म हा माझा विषय
नाहीचं पण नाविन्यचा लवलेश असलेला कोणताही क्षण किंवा प्रसंग काही शिकावूनच जातो हा
माझा आत्मानुभव आहे.
परवा
कुन्दंनचा फोन आला "भावड्या ३१ ला लग्न करतो आहे आणि तू येतोस आहे!"
नाही म्हणायचा तर प्रश्नच नव्हता आधी HR ला जाऊन शनिवारच्या सुट्टीचे सांगितले कधी
कधी क्षणाच विलंब घातकी ठरू शकतो, ह्याने फोन केला आणि बॉस म्हणाला "Book
your ticket for Baroda and you are leaving tonight." "Not today sir, i
will go on Monday as i am going Pune for some personal work"
त्या नंतरची २० मिनिटे मी एक सेल्समन असल्या सारखी गेली, जो कोणत्या तरी नवीन
उत्पादनाचे मार्केटिंग करायला एका श्रीमंत व्यक्ती समोर उभा आहे ज्याला त्या
उत्पादनात काहीच रस नाही तरी सुद्धा त्याने ते उत्पादन विकत घेतल्यावर सेल्समन
च्या संमिश्र आनंदाला जो उधाण येतो तो घेऊन मी जागेवर येउन बसलो. शनिवारीच निघून
पुण्यात दाखल व्हायचे होते काही काम होती ती निपटवून ह्याच्या मामाच्या घरी
पिंपरीला सायंकाळी पोहोचायचे होते पुण्याचा खासा दांडगा अनुभव असल्याने (म्हणजे ते
खालच्या अंगाला वळा, वरच्या अंगाला झाडाखाली वगेरे ….) बाईकनेच जाणे सोयीचे होते,
सकाळी १० ला घरातून निघालो ठाण्यात होणारी एक भेट हुकली, पनवेलला मस्तानीचा छान
बेत झाला आणि मी पुण्याच्या मार्गावर असताना देहूरस्ता ………देहू ……… सारखे समोर येत
होते शेवटी महामार्गा वरील प्रवेशद्वार नजरेसमोरून गेले आणि बाईकला ब्रेक मारला
पुन्हा U टर्न घेतला तो थेट इंद्रायणी काठी थांबायलाच, डोक्यावरचे हेल्मेट काढले
तसा कानाला स्पर्शून गेलेला गार वारा आणि बुवांच्या टाळेचा नाद
"श्रवणीय" ह्या शब्दाला पुरून उरणारा होता.
मी
प्रश्न केला बुवां मगाशी आपण म्हणाल्या प्रमाणे तुकोबांनी वैराग्य धारण केले.
वैराग्य म्हणजे काय नक्की? भुवई किंचित वर सरकली नजर माझ्यावर रोखीत त्यांनी सवाल
केला……… कसल्या
शोधत आहेस नक्की? आज पर्यंत लोकांनी दान म्हणून पैसे दिले, कधी खायला दिले पण
गाऱ्हाणे झाले कि लोक आपल्या मार्गाने निघून जातात. कधी कोणी थांबून बोलत नाही.
आवाजाचा स्तर थोडासा मंदावला होता पण काही बोलायचे मी टाळले, कधी कधी मौनाला जास्त
महत्व असते असेही ह्या कळवलीला माझ्या जवळ काहीच उत्तर नव्हते. आता काय ऐकायला
मिळणार ह्याच विचारात होतो पण माझे तर्क सुरु होण्या आधीच त्यांनी सुरवात केली.
ह्याचे
प्रकार तर खूप आहेत सारे काही मला माहित नाहीत पण माझ्या मते “साधू बनून योग साधना
करण्यापेक्षा समाजात राहून साऱ्या मोहपाशातून स्वतःला मुक्त करून भक्ती आणि
ज्ञानाच प्रसार करणारे "संत" केव्हाही श्रेष्ठच. "त्याग"
एवढासा शब्द पण आचरणात आणायला मानसिक पातळीवर फारच कठीण काम.” खरे तर कसे आहे ना
भक्ती करणाऱ्याला समोर देव आहे कि दानव ह्याची चिंताच नसते अर्थात आपण देवाला
मानतो कारण त्याचा आधार आहे असे आपण मानतो पण दानवाचे काय त्याची भक्ती केली तरी
तो देखील प्रसन्ना होईलच कि! पण देवांचे विचार मानवाला परमार्थ साधायला मदत करतात
आणि दानवी विचार मनुष्याला पाशात ओढून नेतात.........
कोणीतरी
मागून त्यांच्या खांद्याला हात लावल्याचे मी पाहिले कोणीतरी दान देऊ करत होते
बुवां उठून उभे राहिले स्वीकारून स्वतःचे दोन्ही हात जोडून प्रर्थानाबद्ध
झालेल्या व्यक्तिमत्वाला पुन्हा माझ्या माझ्या वेडपट प्रश्नांन मध्ये गुंतवणे
योग्य न वाटल्याने मी पुढच्या प्रवासाला निघालो. इंद्रायणी काठच्या मंदिरात
तुकोबांचे दर्शन तर झाले पण मंदिरात असणाऱ्या भागड माणसांची कीव देखील आली. एक
लहान पोरगा मोबाईल मध्ये गाभाऱ्याचा फोटो पाहत होता माझ्या ही गळ्यात कॅमेरा होता,
त्या मुलाला तसे करताना पाहून सावकाराने आपले कर्ज न फेडणाऱ्या माणसावर जशी झडप
घालावी तसे त्यांनी केले करताना तोंडी छान शब्द होते "भडव्या फोटू काढाया
पाहतु काय!" आता ह्या महान माणसांना समजावण्याचे सामर्थ्य माझ्या मनगटातचं
आहे पण इथे त्याचा वापर न करण्या इतपत समाज देखील आहे माझ्यात. देवांचे फोटो का
काढू नयेत? आणि जर नाही म्हणता तर देवळा बाहेरच्या सगळ्या दुकानांन मध्ये तसे फोटो
उपलब्ध का असतात? वारीला जाणारा प्रत्येक वारकरी विठ्ठलाची असीम भक्ती अंतकरणात
साठवून दर वेळेस येतो तितक्याच भक्ती भावाने गाभाऱ्यातला भटजी भक्ती करतो का?
म्हणजे आधुनिकीकरण नक्की कसले झाले आहे! भक्तीचे कि भक्तांचे सकाळी जेव्हा निघालो
तेव्हा खंडाळ्याच्या घाटात एक मजेशीर दृश्य पहिले.
घाटात लागणारे मंदिर
घाटात मधेच एक मंदिर लागते मी थांबवून फोटो काढत होतो सारखा चिल्लर पडल्याचा आवाज येत होता मग समजले गाडीने जाणारी माणस देवाला दक्षिणा फेकत होते …का तर प्रवास सुखाचा होवो म्हणजे बघा ना पैशाने सगळा विकत घेत येत अगदी देव पण? एक तर देव लाचखोर झाला आहे किंवा मग आपली भक्ती अन्धश्रधेच्या डोहात पार तळाला गेली आहे. कोणी कोणी तर नुसते होर्न वाजवून जात होते हे लोक देवाचे खास असणार आपण मित्रांना करतो न तसे "हाय देवा येताना भेटतो"
मला वाटते "भक्ती हायटेक" झाली असणार ……
इकडचा
गाशा गुंडाळला आणि पुन्हा मुख्य रस्त्यावर आलो समोर बोर्ड होता आळंदी १६ किलोमीटर
ह्या फलकाला हुलकावणी देणे नाही जमले, आता इतक्या छान विचारांचे सूर कानात घुमत
होतेच. पुन्हा इंद्रायणी काठीच आलो शेंदूर, बांगड्या, गंध काय वेगळीच चहल-पहल
होती. गर्दी तशी कमीच होती. तसा वारीला अजून दीड महिना बाकी आहे. नवीनच बांधलेल्या लगीन गाठी, मस्तकी गंध लावणारी
काही वयस्कर मंडळी गंध लावल्यावर मिळालेल्या दक्षिणेवर त्यांची गृहस्थी चालत
असावी, दर्शनाच्या रांगेचा पहारेकरी समजूतदार दटावणी करत होता, माझी पावले काही
आता जायला धजत नव्हती कारण माहित नाही आणि मनात नसेल तर मी देवळात जात नाही.
निघायच्या बेतात होतो आणि पार अतः कारणाचा वेध घेणारी हि व्यक्ती दिसली.
ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन घेऊन पडताना घेतलेले
हे छायाचित्र.
वयक्तिक लिखाणात कोणाच्या दुःखाचा अनादर होत असल्यास क्षमस्व……
माझ्या
सारख्या मूर्खाचे विचार कुठे आणि ह्यांची श्रद्धा कुठे मी म्हणतो देव दाखवा तर
विश्वास ठेवीन आणि ह्यांच्या भक्तीचे वर्णन करायला माझ्या जवळ शब्द देखील
नाहीत. दाटून आलेला कंठ पाण्याच्या घोटाने ओला केला म्हणून पापण्या ओलावल्या नाहीत
आता इथे थांबणे मला शक्यच नव्हते तसाच गाडी ठेवलेल्या ठिकाणी आलो खांद्यावरची बाग
तशीच ठेवली गळ्यात कॅमेरापण तसाच होता हातातली पाण्याची बाटली पायाच्या घडीत ठेवत
आधी तिथून बाहेर पडलो साधारण १० किलोमीटर आलो असेन तेव्हा पाण्याची बाटली पडायला
आली तसा विचारातून बाहेर आलो गाडी थांबवली आणि सगळ नीट सावरून पिंपरी चिंचवडचा रस्ता
धरला.
काय काय
इच्छा घेऊन मनुष्य जन्माला येतो आणि नशिबाची पायवाट कुठवर नेते ह्याहून इच्छाशक्ती
किती प्रखर आहे ह्यावर त्याचा परमार्थ टिकून असतो. आता तर वारीचे वेध अजून प्रबळ
झाले आहेत संपूर्ण २१ दिवस काही जमायचे नाही पण शेवटचे ३ दिवस तरी ………. पाहूया
जमते काय ते!!
तुकाचीये
ठायी पांडुरंग पाहिला
आसमंत गजराला
टाळ वर्णी,
ज्ञानोबा
माउलीचा गजर जाहला
दिंडी सोहळा पायी चालला,
दर्शनास
विठूच्या जीव अधिरला
ध्वज पताकांचा
साज रंगला,
अश्वमेध
रिंगणी बेभान दौडला
जणू प्रपंचाचा
पाश मोडला,
आत्म्याचा
पाठीराखा विठू पंढरी
चालतो अखंड
वाट मी वारकरी.