बुधवार, ९ जुलै, २०१४

पहावा विठ्ठल



            यंदा पुन्हा ते पुण्या कर्म माझ्या नशिबी नाही आले. खंत करू कि सगळी बंधने झुगारून पळत सुटू त्या पांडुरंगाच्या वारीला नाही समजले आणि पुन्हा मी सामाजिक बांधीलकीच सांभाळत राहिलो. गेली अकरा वर्षे मी नेहमी मनाची तयारी करतो आणि पुन्हा ते राहूनच जाते. काय ओढ आहे त्या पांडुरंगाची मला समजत नाही मी कधी देवळात जाऊन पूर्ण रूपाने विठ्ठल पहिला देखील नाही पण मनात मात्र त्याचे ते विश्वरूप मात्र जसेच्या तसे दिसते. ज्ञानेश्वरीच्या १६ व्या अध्यायात सांगितल्या प्रमाणे संयम, निस्वर्थाता, स्थिरचित्त, क्षमा ह्या सारखे देवी गुण आत्म विकासाला, तर काम क्रोध लोभ मत्सर गर्व ह्या सारखे असुरी गुण अधोगतीला कारणी भूत होतात. इतक्या सध्या आणि सोप्या भाषेत संपूर्ण जीवनाचा साभार समजावणारे ज्ञानेश्वर महाराज आपल्याला समजतील का कधी? रुख्मिणीमातेने सुवर्ण पिंपळाला सव्वा लाख प्रदक्षिणा मारल्या होत्या त्याचे पावलात अंतर मोजायचे म्हणाल तर २४० किलोमीटर भरते. आश्चर्य म्हणू कि चमत्कार म्हणू, आळंदी ते पंढरपूर हे अंतर देखील तेवढेच भरते. 

            संजीवनी मंदिराचा कळस हलताना पहायचा आहे. त्या नाद बरोबर लाखो वारकऱ्यांसंग विठू-माउलीचा जय जय कार करायचा आहे. टाळ मृदुंगांच्या नादात धुंद होऊन नाचायचे आहे. वारकऱ्यांची जेवढी जमेल तेवढी सेवा करायची आहे. हेच तर सांगितले आहे ज्ञानेश्वरीच्या ३ ऱ्या अध्यायात प्रत्येकाने निस्वार्थ बुद्धीने समाज हितसाठी आपले कर्म करावे हाच आहे कर्मयोग. आयुष्यातला तो एक दिवस बेधुंद पणे जगायचा आहे हातात झेंडा घेऊन त्या रिंगणात तल्लीन होऊन धावायचे आहे. यंदा हा योग हुकला हे मात्र खरे पुन्हा वाट पहावी लागणार आहे मला पाहूया. 

टाळ मृदुंगांचा नाद 
मुखी हरिनामाचा जप 
हृदयी वसला एक आवाज 
विठोबा रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई 
मैलाची ही वाट वाटे मखमली 
पंढरीच्या वारी चालती वारकरी
एक मुखी करती जय जय कार 
विठोबा रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई 
जनाचा कैवारी उभा विटे वरी 
कर कटा वरी घेउनिया 
तुकाचीया मुखी नामाचा गजर 
विठोबा रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई 


बुधवार, २ जुलै, २०१४

गुणधर्म



          सुगंध, झिजणे हे सगळे गुणधर्म झाडांना शोभतात कारण त्यात त्यांचा स्वार्थ नसतो. झाडांना देणे हा एकाच गुणधर्म माहित आहे, पण त्या साठी आपल्याला झाडा जवळ जावे लागते कधी झाड सावली वाटत फिरते आहे असे ऐकले आहे काय! ह्या उलट माणसाना चंद्राची उपमा चांगली वाटते. कारण दुसर्‍याचा प्रकाश तो स्वतः कडे घेऊन प्रकाशित होतो. आपण देखील दुसर्‍याच्या अनुभवातून त्यांच्या जीवनातून बरेच काही शिकतो. पण चंद्राला अमावसेचा अभिशाप आहेच कि. त्याचा शीतल प्रकाशाला आपण माणसाचा स्वभाव मानले तर त्याचे डाग आपला अहंकार नाही का बनणार.

झटकायचे काय आणि ठेवायचे काय ह्याचा विचार आपण करतो पण ह्या सगळ्याचे आचरण आपण करतो का?

        पण जीवन असेच असते, म्हणतात त्याने समतोल साधला जातो समतोल साधण्यासाठी आपल्याला सोबत लागते. सोबत, मग लहान वयात आई-बाबा असतात. नंतर बायको मुले पण ह्या सगळ्यात अगदी सुरवाती पासून शेवटा पर्यंत सोबत जर कोणी राहतात तर ते मित्र असतात. आणि मित्रांना उपमा नसते त्यांना नाते देखील नसते ते फक्त मित्र ह्या समीकरणात चांगले वाटतात मग हक्क आणि अधिकार ह्याची लालसा त्याला नाही येत पण आधार मात्र खूप मिळतो. समतोल साधायला आधारचीच तर गरज असते. एकदा आपण आपल्या पायावर उभे राहिलो कि झाले.