बुधवार, २ जुलै, २०१४

गुणधर्म



          सुगंध, झिजणे हे सगळे गुणधर्म झाडांना शोभतात कारण त्यात त्यांचा स्वार्थ नसतो. झाडांना देणे हा एकाच गुणधर्म माहित आहे, पण त्या साठी आपल्याला झाडा जवळ जावे लागते कधी झाड सावली वाटत फिरते आहे असे ऐकले आहे काय! ह्या उलट माणसाना चंद्राची उपमा चांगली वाटते. कारण दुसर्‍याचा प्रकाश तो स्वतः कडे घेऊन प्रकाशित होतो. आपण देखील दुसर्‍याच्या अनुभवातून त्यांच्या जीवनातून बरेच काही शिकतो. पण चंद्राला अमावसेचा अभिशाप आहेच कि. त्याचा शीतल प्रकाशाला आपण माणसाचा स्वभाव मानले तर त्याचे डाग आपला अहंकार नाही का बनणार.

झटकायचे काय आणि ठेवायचे काय ह्याचा विचार आपण करतो पण ह्या सगळ्याचे आचरण आपण करतो का?

        पण जीवन असेच असते, म्हणतात त्याने समतोल साधला जातो समतोल साधण्यासाठी आपल्याला सोबत लागते. सोबत, मग लहान वयात आई-बाबा असतात. नंतर बायको मुले पण ह्या सगळ्यात अगदी सुरवाती पासून शेवटा पर्यंत सोबत जर कोणी राहतात तर ते मित्र असतात. आणि मित्रांना उपमा नसते त्यांना नाते देखील नसते ते फक्त मित्र ह्या समीकरणात चांगले वाटतात मग हक्क आणि अधिकार ह्याची लालसा त्याला नाही येत पण आधार मात्र खूप मिळतो. समतोल साधायला आधारचीच तर गरज असते. एकदा आपण आपल्या पायावर उभे राहिलो कि झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा