2014 वर्षीची सांगता स्वप्ना पाटीलच्या SugerBox ने आणि
गंभीरगडचा ट्रेक करून झाली होती. या वर्षी सुशीलच्या लग्नाने झाली. अगदी नवीन
वर्षाचा सुर्य आम्ही सगळ्यांनी एकत्रच पहिला. यंदा "हटकेश्वर" सोडला तर
तसे खासे ट्रेक लक्षात नाही राहिले त्यात सह्याद्री तुर्ताशः दुरावणार आणि नवीन
वर्ष ऑफिसच्या चौकटीत जास्त जाणार हे नक्की आहे. प्रवास म्हणून मुंबई-वडोदरा वारी
होत राहील. पण जुलै मध्ये मनात असेलेली इच्छा जर पूर्ण झाली तर मला त्याचे जास्त
शल्य नाही लागणार. पाहूया जमतंय का ते! गत वर्षी झालेल्या माझ्या मित्रांच्या
दोनच्या-चार ह्या समारंभांत आमच्या मातोश्रीनी उपस्थिती लावलेली आहे त्यामुळे
माझ्या न्यूईअरचे रेज़लूशन (पुन्हा तेच) तयार असेल. ज्यावर तिचा जास्त भर असणार
आणि मी स्वतःच्या कामात व्यस्त राहणार. (आता तिला कसे समजावू, त्याच
गोष्टींच्या मागे लागायचे ज्याच्यात तथ्य असते.)
ह्या वर्षी बरेच काही अनुभवले नॉर्मली instinct वर जगणारा मी,
थोडाफार विचलित झालो. बऱ्याच गोष्टी घडल्या, बरेच मजेशीर क्षण अनुभवले, काही नवीन
मित्र सोबत राहिले, काहीं आपआपल्या अनुमानांवर ठाम राहले. असो असे चालायचेच. सारे
एकसारखे नसतात तसे त्यांचे विचार देखील एक सारखे
नसतात. Present-tense महत्वाचा, भविष्याच्या वाटेवर चालताना, भूतकाळ
आठवणीना बहाल आणि वर्तमानकाळ मनगटाच्या बळावर पेलून धरला आहे.
शब्दांची उलथापालथ झाली कि नात्याचा अर्थ समजतो कोणाच्या असण्याचे महत्व
समजते. खरे तर नात्यात जपण्यासारखे काहीच नसते, असते ती निव्वळ गरज एखाद्या
रंगमंचावर चालणाऱ्या नाटका प्रमाणे, प्रसंग बदलला कि आपल्या Exit ची वेळ आली
ह्याचे भान ज्याने ठेवले तो सुंदर आयुष्य जगतो. मग त्याला दुसऱ्या नाटकातील
वैविध्यपूर्ण एखादी भूमिका बजावायला स्वतंत्र विचार करता येतो. त्यातल्या त्यात जर
का पुन्हा त्याच नाटकात काम करायला विचारणा झालीच तर अनुभव गाठीशी आहेच कि!
लोक
नात्यांना वेगवेगळ्या नावात का जोडतात ह्याचे कोडे मला नेहमीच पडते! वास्तविक सगळे
जण Mutual Understanding वर जगले तर फार बरे झाले असते. मग हेवे-दावे नसते, राग-रुसवे
नसते, महत्वाचे म्हणजे वैचारिक स्वतंत्र मिळाले असते. सगळ्या नात्यात हक्काचे
असतात ते "मित्र" पण कधी कधी ह्याही नात्याला बंधनात जोडण्याचा प्रयत्न
होतोच. कधी यशस्वी तर कधी फसतो. फसलेल्या प्रयत्नात असे होत असते कि आपल्याला काय
हवे आहे हेच एखाद्याला समजत नसते? मग अश्या वेळी काय? तिथल्या तिथे समजावणे कधी
कधी भारी पडते. कारण समोरची व्यक्ती समजण्याच्या परिस्थितीत नसते. शब्दशः मी
म्हणेन तटस्थ राहायचे? वाट पहायची?
परिस्थितीवर सगळ्यात जालीम पण उपायकारक औषध म्हणजे "वेळ". फक्त
त्या वेळेचा ढोस किती द्यायचा हे ठरवता आले पाहिजे. आणि दर वेळेस त्याची मात्रा
योग्य ठरवता येईलच असे नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा