मंगळवार, १४ जानेवारी, २०१४

काय मिळते रे तुला त्या दगडान मध्ये?



काय मिळते रे तुला त्या दगडान मध्ये? जेव्हा बघावे तेव्हा तिकडेच असतोस? अख्या सह्याद्रीवर विजय मिळवणार आहेस काय? विजय कोणावर? सह्याद्रीवर नाही कधीच जमणार नाही. प्रचंड म्हणता येईल अश्या मुघली फौजांना जे नाही जमले, इतके प्रचंड सह्याद्रीचे हे रूप. दोन डोळ्यात न मावणारे पण संपूर्ण मराठा साम्राज्याला थारा देणारे.
११ जानेवारी २०१४ पुन्हां एकदा लिंगाण्याला स्वारी झाली आम्ही जाऊन गड स्वार केला म्हणण्या पेक्षा त्याने आम्हाला तसे करून दिले असे मला वाटेते. लिंगाण्यावर मधल्या एका जागी एकटाच बसलो होतो बसायला जागा म्हणजे अगदी ३ फुट आणि पुढ्यात १००० फुट दरी मग मला काय हौस स्वतःचा जीव टांगणीला ठेवण्याची लाइफ सेविंग म्हणून टेप सिलिंगने स्वतःला बोल्ट मध्ये अडकवले होते कुठून आले हे धाडस आमच्या अंगी. आमची बस प्रचंडगडाच्या मागून जात होती किती विशाल आणि रौद्र रूप दिसत होते. शिवाजी महाराजांना पण त्याच्या ह्याच आकाराने मंत्रमुग्ध केले असेल नाही. मस्ती करताना मयुर ने एक किस्सा सांगितला त्याच्या मित्रांचा, त्याचा एक मित्र प्रचंडगडा बदल म्हणाला होता "शिवाजी महाराजांचा पहिला ट्रेक न रे!" हसण्या वारी नेण्या सारखेच पण जर विचार केला तर किती गोष्टी मनात येतात खरेच महाराजांनी पण इथेच उभे राहून प्रचंडगडाचे हे रूप पहिले असेल नाही आणि स्वराज्याचे तोरण बांधण्याचा विचार केला असेल. ते काय वय होते काय एवढे धाडस करण्याचे? त्या मातेला काय वाटले असेल स्वतःच्या मुलाला असले धाडस करताना पाहून भीती/अभिमान! कल्पना तरी करवते काय आपल्याला.
काय ते मावळे जीवाची पर्व न करता प्रचंड सैन्याला पण पाळता भुई करून सोडणारे (प्रतापगडावर मंदिरात एक ३ फुटी तलवार पहिली होती त्यावर शिक्का नोंदवला आहे असे ६ शिक्के आहेत त्या तलवारीवर आणि एक शिक्का म्हणजे १०० माणसे मारली असा होतो) ते बाजीप्रभू, तानाजी, नेताजी, कान्होजी, बहिर्जी एक दोन तीन आकडे संपून जातील पण त्याचे धाडस नाही मोजता येणार. अफझल आला तेव्हा महाराजांनी धरलेला धीर! सिद्धीचा वेढा तोडून जाताना मनाची चालेली धावपळ! साल्हेरचे युद्ध, उंबेरखिंडीत शक्ती पेक्षा जास्त युक्तीचा केलेला वापर! स्वत:च्या मुलाला पार दूर आग्र्याला आपल्या पासून दूर करून यावे लागले काय मनात आले असेल त्या वडिलांच्या, आणि त्या मुलाने पण काय धाडस दाखवले. काय पहिले असेल महाराजांनी ह्या सह्याद्री बद्दल!  काय वाटले असेल त्यांना ह्या प्रत्येक गडा बद्दल! राज्याभिषेकाच्या वेळी त्यांच्या मनात काय विचार असतील, तो रायगडी सजलेला दरबार ते वैभव तो जयजयकार, साक्षात दुष्मानाने पण ज्यांचा गौरवाच केला असे शिवराय. आणि त्या सिंहाच्या छाव्याला काय म्हणू १४ भाषांवर वर प्रभुत्व, उत्तम साहित्यिक, एकाच वेळी ९ आघाड्यांवर कर्तुत्व गाजवणे काय सोपे काम आहे. ९ वर्षांच्या काळात त्यांनी १२८ लढाया जिंकून आपल्या पित्याच्या नावाला खूप मोठा सन्मान प्राप्त करून नाही का दिला. वयाच्या ३२व्या वर्षी औरंगजेबा समोर गुडघे न टेकता मातृभूमीसाठी मरणाला बहाद्दुरीने मिठी मारणाऱ्या राजा बद्दल मनात काय विचार आहेत कसे सांगू मी
मी ह्या सगळ्या चा फक्त विचार करू शकतो अंदाज बंधू शकतो ते जगणे हि मला नाही आणि ते मरण देखील नाही कदाचित अशीच उत्तरे मी तिकडे नेहमी शोधत असेन पण नाही मनाची शांती ती काही होत नाही मग पुन्हा नवीन मोहीम हाती घेतो पुन्हा निघतो.
इथे आलो कि ह्या दगडान मध्ये स्वतःचे अस्तित्व मिळते, विश्वास दिसतो, ताकद मिळते, स्वातंत्र्य मिळते, आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे एक चीर-शांती मिळते. जी आजच्या ह्या धावपळीच्या शहरी जीवनात हरवत चाली आहे. माझा सह्या सखा मला हे सगळे देतो मग मी का नको त्याची ओढ धरू.






२ टिप्पण्या:

  1. Farach Chhan Pritam.. agadi surekh varnan keles..Tujhya hya chadhaya ashyach suru rahot aani Mavale banun aamhi tula saath det rahu...maharajanchya prabhavane bharavalele vichar aahet tujhe..Khupach chhan.

    उत्तर द्याहटवा
  2. Pritam khup chan lihitos. Tuze likhan vachun sukhad anubhav aala. Pratyaksh itihas anubhavlyacha aanand milala. Tu tuze likhan aani tuzi sahyadritil bhatakanti ashich chalu thev.

    उत्तर द्याहटवा