गेल्या वर्षी श्रेयसने पसरवलेला Enduro नामक वायरस या वर्षी
चांगलाच फोफावला होता. अश्यातच रिद्धी, अनिकेत आणि सुधीरच्या टीम "Gladiator's"
ने "born to win" असे
poster समोर आणले आणि त्या पाठोपाठ
अश्विनी आणि श्रेयस ह्या आपल्या जोडीदारांना घेऊन हेमेश ने त्याच्या टीम "Dignity" ला
“More then to win, we are here to complete Race with the Pride” ह्या
TAG लाईन खाली Introduce
केले. तिकडे कुंदन, निधी, आणि दुश्यंत ह्यांची “3 musketeers”. अश्या तीन टीम तयार होत्या.
ह्यात भर ती काय दीपकला कल्पेश ने बगल देऊन पण तो त्याची टीम जमवत होता शेवटी त्याने
भाग्यश्री आणि भरतला घेऊन “DB^2” हि टीम उभी केली. गेल्या वर्षी ह्याच स्पर्धेच्या
निमित्ताने मी, अजय आणि स्वप्ना अशी टीम “APS” तयार झाली होती.
From Left: - RIDDHI - SUDHIR - ANIKET
From Left: - DEEPAK - BHARAT - BHAGYASHREE
From Left: - PRITAM - AJAY – SWAPNA
या वर्षी
सुद्धा आम्ही टीम "APS" म्हणूनच
स्पर्धेत भाग घेणार होतो. पण यंदा स्पर्धेत उतरू कि नाही ह्याचे काही नक्की
नव्हते कारण स्पर्धेच्याच दिवसात स्वप्नाला ऑफिसच्या काम निमित्त चेन्नईवारी करावी
लागणार होती. आमच्या डॉक्युमेंट्स तयार असून सुद्धा स्वतःजवळच ठेवल्या
होत्या. अश्यातच स्पर्धेच्या काही दिवस आधी स्वप्नाच्या चेन्नई
एक्सप्रेसला लाल दिवा दाखवून साईड लाईनला उभे केले गेले. आणि आमचा स्पर्धेचा मार्ग
मोकळा झाला.
आता स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचायचे कसे ह्यावर कोणाचे एकमत होत नव्हते. साधारण १५ जण होतो. निधी फक्त कामानिमित्त पुण्यात असल्याने तिकडेच भेटणार होती.
एक १७ सीटर बस करूया असे ठरत होते पण ह्यात एक पेच होता जो पर्यंत शेवटची टीम येत नाही
तो पर्यंत संपूर्ण बस थांबवून ठेवायला लागणार होती. आता कोण किती वेळात संपवेल ह्याचा
काही नेम नव्हता. मग शेवटी आम्ही गट करून
प्रवास करायचा निर्णय घेतला. मी सुमितला विचारले तुझी गाडी मिळेल का? ह्यावर तो
स्वतःच यायला तयार झाला साहजिक आहे आमचा थोडा वर खर्च होत होता पण त्याहून महत्वाचे
आरामात प्रवास होणार होता. ब्रिफिंगच्या वेळी आकाश
(Enduro Marshall)) ने सांगितले होते कि तो प्रमाणपत्र मुंबईत उपलब्ध करून दिली जातील म्हणून त्यामुळे रविवारी बक्षीस समारंभाला नाही थांबलो तरी चालणार होते. म्हणून स्वतंत्र गाडी परवडणारे Option होते. कारण गेल्या वर्षी पेक्षा
यंदा स्पर्धेचा सूर पूर्ण पणे वेगळा होता. यंदा सकाळी सुरवात न ठेवता दुपारी ४
वाजता सुरवात होणार होती म्हणजे सिंहगडावर पोहोचायला रात्र निश्चित होती. टीम Dignity आणि टीम APS आम्ही एकत्र प्रवास करणार होतो. बाकीचे
आपल्या परीने स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचणार होते. ऑगस्ट २ सकाळची सुरवातच एकदम भारी
होती. तयारी करत असतानाच आई म्हणाली अरे समोरच्यांच्या घरात साप आला आहे. म्हंटले कोणी
आहे का काढायला तर म्हणाली नाही. आदल्याच दिवशी नागपंचमी होऊन गेली होती. खाली आलो म्हंटले कुठे आहे तर त्या काकांनी हाथ दाखवला. निट बघितले बिनविषारी
सर्प होता अगदी शांत पणे देवाच्या फोटो मागे बसला होता. हाताने पकडायचे नसते धाडस मी
करणारच नव्हतो. साप अंधार असणाऱ्या दिशेला आकर्षित होतो त्याला ते सुरक्षित बीळ वाटते.
एक पिशवी घेतली त्याच्या तोंडाच्या समोर धरली आणि मागून त्याला हळूच उचले तसा त्याने
पिशवीत उतरायला सुरवात केली पूर्ण आत आला तसे लागलीच पिशवीचे तोंड बंद करून दोरीने
बांधून टाकले. आता मोठा प्रश्न होता ह्याला सोडायचा कुठे इकडेच जवळपास सोडले तर कोणी
मारतील. मग काय घेऊन निघालो त्याला आणि पार दूर विरारला द्रुतगती मार्गावर सोडले. तसेच
गाडीने पुढे निघालो कळव्याला आलो तिकडेच सगळे भेटलो अश्विनीला (THE BODYBUILDER) बरेच दिवसाने पहिले होते म्हंटले बापरेरे रे रे रे …… तिची स्पर्धा जवळ
होती म्हणून तीचे खाणे-पिणे बंद होते. नुसते एक सफरचंद खात होती ते हि दिवसाला आणि
त्यांचे ते काय ते प्रोटीन. (त्या प्रोटीनची चव कशी लागते हे अश्विनीपेक्षा स्वप्ना
जास्त चांगले सांगेल.) पुण्यात आम्ही जेवायला थांबलो तेव्हा मात्र तिने २ चपात्या
खाल्या. तिने Bodybuilding स्पर्धेसाठी तिने खूप मेहनत घेतली आहे. असे असून देखील हेमेशला दिलेल्या
शब्दा खातीर ती K2S मध्ये भाग घेण्याच्या आपल्या
निर्णयावर ठाम राहिली ह्या बद्दल माझ्या तर्फे तिला एक Grand Salute.
आम्ही
साधारण २ वाजता कात्रजच्या जुन्या बोगद्य जवळ आलो. हा मार्ग जुन्या काळात सुद्धा सातारा
आणि पुणे साठी भुलेश्वर डोंगर रांगेतील हा जोड रस्ता होता. मात्र आता हौशी ट्रेकर्स
मंडळी काय ती फक्त ये जा करतात. कारण साधारण १८ ते १९ डोंगर पार केले कि सिंहगडी पोहचता
येते त्याला पर्यायी मार्ग म्हणून सरकारने १९६० साली कात्रज जवळ एक बोगदा बनावून दळण-वळणाचा
मार्ग सोपा केला.
ह्या आधी सुद्धा स्पर्धेत भाग घेतला होता पुढच्या सगळ्या Formality's टीम
लीडने अगदी आरामत संपवल्या. टाईम कार्ड आणि आय डी कार्ड अश्या सगळ्या गोष्टी घेतल्यावर स्पर्धेचा बिगुल वाजण्याची आम्ही वाट पाहत होतो. स्पर्धेच्या आधी आम्ही बरीच मस्ती
करत होतो. प्रत्येकाचे स्वतंत्र असे फोटोशूट चाले होते. यंदा Red Bull वाले Sponsor होते.
दोन मुली मोठ्या बॅग मध्ये Red Bull वाटत
फिरत होत्या. मग काय पाहिजे तेवढे गटकावले आम्ही.
Best काय? Red Bull कि Red Bull वाटणाऱ्या पोरी
सगळ्यांना रांगेत उभे केले. टीम Gladiator चा नंबर पहिला होता अनिकेत ने दिमाखात Z News वाल्यांना मुलाखत दिली. सगळ्यांना चिअर करत आम्ही आमच्या नंबरची वाट पाहत होतो.
पहिली टीम फ्लॅग ऑफसाठी सज्ज
साधारण ४.२५ ला आम्हाला
सुद्धा फ्लॅग ऑफ मिळाला. पुढे पाहिले सगळेच धावत होते आम्ही
तिघे पण निघालो पहिल्या टेकडीवर येऊन सगळ्यांची हवा कमी व्हायला लागली. आता खरी स्पर्धा
सुरु झाली होती आम्ही तिघे तर जसे झोपेतून उठून आलो होतो प्रक्टिस काहीच केली नव्हती.
अश्यातच पाहिले तर सगळ्यात आधी निघालेल्या सुधीर आणि कुंदनच्या टीम दिसेनाश्या झाल्या
होत्या आणि हेमेशची टीम पूर्ण दमखम लावून धावत होती. आणि मागे राहिलो होतो आम्ही आणि
दीपकची टीम ह्यात दीपक आणि भरत पूर्ण पणे जोश मध्ये होते पण भाग्या मुळे त्यांचा
वेग काहीसा मंदावला होता. (स्पर्धेतील हीच खरी ट्रिक आहे टीम मध्ये एक तरी मुलगी हवी
हि अट महत्वाची ठरते.) पहिली टेकडी पार करताना अजयला थोडा पाठीत त्रास होत होता. स्वप्नाने
त्याला हाथ दिला मी थोडा पुढे होतो पाहिले एक टीम थांबली होती त्यांच्यातील
मुलीच्या पायात क्रम्प्स येत होते. ट्रेकिंग मधली सवय अंगवळणी पडली आहे. कोणाला
सोडून जायचे नाही मग तिला प्रथमोपचार देऊनच पुढे गेलो. पहिली टेकडी चढल्यावर समोर
दिसतो तो भुलेश्वर डोंगररांगेचा अप्रतिम हिरवागार नजरा.
रिमझिम रिमझिम पाऊस चालू होताच लाल मातीचा रस्ता निसरडा झाला
होता. चढताना पूर्ण पणे जोर लावायचा आणि उतरताना पायात सगळा जोर एकवटवायचा अशी कसरत चालली होती. बरेच जण घसरगुंडी करत उतरत होते. उतरणीवर सोसाट्याचावारा
असायचा अश्यात स्वतःला सांभाळत आम्ही उतरत होतो. एकूणच वातावरणा स्पर्धा ह्या शब्दास अनुकूल झाले होते चालत उतरायचा प्रयत्न
केला तर वेळ वाया जाणार होता आणि धावत जायचे
म्हणजे धडपड होणार होती. जिंकण्यासाठी आवश्यक ती तयारी आमच्याकडून
झालीच नव्हती त्यामुळे आम्ही स्पर्धेच्या सुरवातीलाच ठरवले होते ह्या स्पर्धेचा थरार
अनुभवायचा जास्त धडपड करायची नाही. आता आम्ही तिघेच
मध्ये राहिलो होतो हेमेश, कुंदन, सुधीर ह्यांच्या टीम कधीच दिसेनाश्या झाल्या होत्या
आणि दीपकची टीम आता बरीच मागे पडली होती. अधे-मधे लागणाऱ्या
टी.सी. आणि पि.सी. पॉइंटवर टीमलीड ने थांबून आपले टाईम नोंदवायचे होते ते काम स्वप्ना
करत होती. त्यासाठी देखील एक अट होती कि तीनही स्पर्धक एकत्र किंवा मार्शलच्या नजरेच्या
टप्यात असावे लागतात. साधारण ६ ते ७ टेकड्या संपल्यावर जे पुढे होते ते पुढेच राहिले
आणि जे मागे ते मागे कारण इकडून शरीरातला दमखम पुन्हा
एकवटवून धावायचे म्हणजे तिघांच्या अंगात तेवढे त्राण हवेत. हि रिले रेस नव्हती ज्यात
एका टप्प्या नंतर दुसरा स्पर्धक धाव घेतो. इथे तिघांना एकत्ररित्या तितकाच जोर लावायचा
होता. आता आम्ही मध्ये भेटणाऱ्या सगळ्यांना चिअर करत, फोटो काढत, मस्ती करत पुढे जात होतो. मध्ये आम्हाला एक टीम भेटली स्पर्धेत भाग घेण्याची त्यांची पहिलीच वेळ होती. त्यामुळे त्यांनी कपडे, खायला नुसते खाणे नाही तर रात्रीचा डब्बा सुधा आणला होता आणि इतर समान त्यामुळे त्यांची बॅग बऱ्यापैकी वजनदर झाली होती. दोन्ही मुले पूर्ण उत्साही दिसत होती पण छोट्या ताईची मात्र पूर्ण दमछाक झाली होती त्यातला एकजण तिची आणि स्वतःची अश्या दोन्ही बॅग घेऊन चालत होता. विचारणा केली असता समजले तिघेही आळंदी वरून आले होते. साधारण शेवटचा टप्पा जवळ येत होता इकडे एका ठिकाणी मार्ग बदलून रस्त्यावर यावे लागते आणि तिकडून "आवरी" जवळ यायचे इकडे प्रोटीन म्हणून अंडी आणि ग्लूकॉन्डी दिले जाते. आता अंधाराचा सुर्य उगवला होता. विद्युत प्रकाश झोतात पुढचा मार्ग शोधत सगळे चाललो होतो. बऱ्याच जणांच्या घरी लाईट गेली असल्याने त्यांनी त्यांच्या बॅटऱ्या घरात उजेड करायला ठेवल्या होत्या. अश्या महाभागांना रस्ता दाखवत आणि सांभाळत आम्ही "आवरी" आधीच्या पी.सी. पॉइंटला आलो. इकडून पुढे आम्ही तिघेच होतो आवरीला आलो तर आकाश आणि श्रद्धा समोर होते (मुंबईचे मार्शल) अंडी आणि एनर्जि ड्रिंक घेऊन पुढे टी.सी. पॉइंटला आलो समोर गाडीत पुरंदरे सर बसले होते. स्वप्नाने कार्डवर वेळेची नोंद करून घेतली आम्ही पुढे निघणार इतक्यात प्रताप सर म्हणाले रेड बुल पिणार काय चहा असता ना तर अजून बरे वाटले असते पण दुधाची तहान ताकावर म्हंटले येउन दे गटागट संपवले आमची मस्ती चालूच होती. हे पाहूनच कि काय त्यांच्या तोंडून निघाले "तुम्ही आताच रेस सुरु केलीत एवढे ताजे तवाने दिसतात आहात" "सांभाळून जा रे पुढे घसरण फार आहे" त्यांचे बोलणे जरा नवलच वाटले. ती compliment घेऊन आम्ही पुढे निघालो आता मात्र जो रस्ता लागतो तो स्पर्धेतला सगळ्यात बेस्ट परत आहे. संपूर्ण रस्ता (रस्ता नाही उतरण आहे पूर्ण) निसरडा त्यात पुढे गेलेल्या स्पर्धकांनी घसरून घसरून पूर्ण रस्ता सपाट करून टाकला होता. आम्ही कसे बसे सांभाळत उतरत होतो साधारण मध्ये आलो आणि अचानक मागे कोणी तरी पडल्याचा आवाज झाला मी मागे वळालो स्वप्न बाजूला होती आणि अजय रस्त्याच्या मध्ये थोडा मागे पाहिले तर एक मुलगी साधारण १२ ते १५ फुटावरून पडली आणि घसरतच अजयच्या दिशेने येत होती त्याला म्हटले पकड तिला नाही तर तुला पण नेईल ती अजयने तिला थांबवलेच होते तेवढ्यात दुसरी देखील तश्याच प्रकारे धडपडत आली आणि तिसरी नीट घसरगुंडी करून ह्याचा अर्थ त्या पडल्या नव्हत्या मुद्दामून तस्य प्रकारे आल्या होत्या जेणे करून त्यांचा वेळ वाचेल. अजयने जिला अडवले तिला लाग्ले का हे विचारायला तोंड उघडले होतेच कि तीच म्हणाली "चला चला लवकर" हे मागच्या दोघींना उद्देशून होते. क्षणाचा कालावधी लागला असेल त्या तिघींना आम्हाला दिसेनाश्यापण झाल्या मी स्वप्ना आणि अजयला म्हणालो आपले वय झाले आहे जिंकण्याचा जो आवेश असावा लागतो त्याचे ते प्रात्यक्षिक होते. ह्यातही मोठी गोष्ट म्हणजे त्या कॉलेजीअंन्स कॅटगरी मध्ये होत्या म्हणजे आमच्या २ तास नंतर त्याचा फ्लॅग ऑफ झाला होता आणि त्या आम्हांला टेकओव्हर करून निघून सुद्धा गेल्या होत्या. आवरीवरून खाली उतरलो कि अटकारवाडी नावाचे गाव लागते. गावातून सिंहगडावर जायचा मार्ग आहे. मध्ये पाण्यचा एक ओढा पार करून आम्ही पुन्हा एक टी.सी. पॉइंटला आलो. नोंदणी करत असताना २ स्त्रिया मार्शलजवळ त्यांच्या टीमची चौकशी करत होत्या बोलण्यावरून जाणवले त्या कॉलेजच्या टीचर असणार. (त्यांच्या बोलण्यातला Confidence आम्हाला सारे काही सांगून गेला) स्पर्धे साठी त्यांनी केलेल्या तयारीचा पाया किती भक्कम होता हे जाणवले.
पुढे आलो आणि समोर दिसला महाकाय वाटेल असा सिंहगड. आणि आठवली तानाजीच्या शौर्य रात्रीच कहाणी. तसा ह्या गडाचा इतिहास तसा रोमांचक आहे साधारण १६४७ साली शिवाजी महाराजांनी सिद्दी अंबर ह्याच्या संगनमताने गड काबीज केला होता. त्या नंतर लगेचच २ वर्षात म्हणजे १६४९ मध्ये शहाजी राजांची सुटका करायला गड आदिलशहाच्या स्वाधीन करावा लागला होता. आणि पुन्हा १६५६ साली बापुजी देशपांडे ह्यांच्या मदतीने गड पुन्हा "कोंढाणा" स्वराज्यात सामील केला. लुटुपुटूची लढाई एवढ्यावर नाही थांबली १६६५ मध्ये पुरंदरचा तह झाला ह्यात पुन्हा गडाचा ताबा मुघलांनकडे गेला.
उदय भानूचा अस्त करुनी, आज जिंकूया गडा
चल यशवंती करू चढाई, पार करूया कडा
शिवबाला नजराणा देऊ, गाडी वाजवू चौघडा
तोवर राहील बाळ रायबा, लग्नवेदीवर खडा
४ फेब्रुवारी १६७० साली आपल्या मुलाचे लग्न बाजूला ठेऊन तानाजी मालुसरे गड पुन्हा
स्वराज्यात आणायला निघाला. गडाचा सरदार उदयभान नावाचा राजपूत होता. द्रोणागिरी कड्या
वरून घोरपडीच्या (यशवंती) सह्हायाने साधारण ५०० मावळ्यांना घेऊन तानाजीने गडावर हल्ला
चढवला. दोन्ही सरदार इरेस पेटले होते हार मानायला दोघांच्या तलवारी तयार
नव्हत्या अश्या घमासान धुमश्चक्रीत तानाजीची ढाल तुटून पडली पण पठ्ठ्या हार मानेल तर
ना. शिवरायांचा अवतार आणि स्वराज्याचा विचारच म्हणजे तानाजी. त्याने आपल्या
हाताला शेला गुंडाळला आणि प्रतिकार चालूच ठेवला रक्त सांडत होते पण
त्याची पर्वा तानाजीला अजिबात नव्हती अश्यातच उदयभानुचा एक वार वर्मी
लागला आणि तानाजी धाराशायी पडला. हे पाहून मराठ्यांनमध्ये खळबळ माजली तानाजी सारखा
सरदार पडलेला पाहून त्यांनी अवसाण गीळले इतक्यात समोर उभा ठाकला सूर्याजी दुसरा तानाजीच
जणू तो त्याचे शब्द मराठ्यांच्या वर्मी लागणारे ठरले "तुमचा बाप तिकडे
मरून पडला आहे आणि तुम्ही पाळता आहात" बस हर हर महादेवाच्या गर्जनेत आसमंत गडाडला
आणि गड काबीज करूनच मावळ्यांनी तलवारी म्यान केल्या. महाराजांना आनंदाची आणि
दुःखाची अश्या दोन्ही बातम्या एकत्र मिळाल्या. त्याच भावनेच्या भरात महाराजांच्या
तोंडून गडाचे नामकरण सिंहगड असे झाले. ("गड आला पण सिंह गेला").
ह्या साऱ्या विचारांत असताना अजयचा आवाज आला "थांब रे चहा पिऊया". साधारण ७ नंतर सगळे काही बंद होते पण आज स्पर्धा असल्याने एका जोडपे थांबले होते चहा घेतला आणि पुढच्या मार्गाला लागलो. इतक्या वेळ अंगात असणारी सहनशक्ती आता बऱ्यापैकी कमी झाली होती. अंगातले उरलेसुरलेले त्राण एकवटून चढत होतो. पण वेग बराच मंदावला होता. समोर काही जण बसले होते नीट पाहिले तर स्वाती भिसे तीच्या टीम बरोबर होती ह्यांनी कॉर्पोरेट मिक्स मध्ये भाग घेतला होता. काही वेळ चलो असू तर एक टीम बसली होती म्हंटले काय झाले चाल आता संपताच आले आहे त्यातला एक जम म्हणाला माझ डोक खूप दुखत आहे. त्याला एक डोकेदुखी थांबवायला गोळी दिली आणि त्यांना बरोबर घेऊनच पुढे चालू लागलो. बराच वेळ चालून सुद्धा गड काही संपत नव्हता. अर्ध्यावर आलो आणि ती आळंदीची टीम परत भेटली आता तर ती ताई पार दमली होती पण जिद्द मात्र सोडली नव्हती तिने. म्हंटले काही खायला हवे काय कि पाणी पाण्याला तिचा होकार होता अजयने तिला पाणी दिले म्हंटले बघ आता आपण अंतिम टप्प्यात आहोत हळू हळू का होईना संपवा. तिला एक स्निकर खायला दिले आणि हळू हळू पुढे निघालो. काही वेळ चलो असू कधी संपणार हा विचार मनात घोळत असतानाच कानावर "प्रितम" अशी हाक आली म्हंटले हा बंड्या आहे पुन्हा हाक आली ह्यावेळी कुंदनचा आवाज आला म्हटले आता बस चला जवळच आहोत. वरच्या दिशेला पाहिले मिट्ट अंधारात आणि दाट धुक्यातून पण मला काही आकृत्या स्पष्ट दिसत होत्या. पुणे दरवाज्याच्या दिशेने वर चढताना कुंदन आणि बंड्याचा आवाज स्पष्ट होत गेला. आम्ही गडाच्या अगदी अंतिम टप्प्यात होतो आता एक पी.सी. पॉइंट आणि मग टिळक बंगल्यावर पोहोचून स्पर्धा संपल्याचा बिगुल वाजवणार होतो. त्यांच्या आवाजाने शरीरात पुन्हा ताकद संचारली आणि आम्ही पटापट चालू लागलो. पी.सी. पॉइंटवर नोंद करून आम्ही टिळक बंगल्याच्या दिशेने निघालो साधारण १० मिनिटे चाललो सगळी कडे दाट धुके पसरले होते आम्ही बंगल्याजवळ आलो. आमचे टाईम कार्ड परीक्षकांना दिले त्यांनी शिक्का मोर्तब करून स्पर्धा संपल्याचे घोषित केले आणि सगळ्यान प्रमाणे आम्हाला पण मेडल्स दिले आता जीव शांत झाला होता. इतका वेळ केलेली धावपळ मेहनत सारे फळाला आल्या सारखे वाटले.
हेमेश आणि कुंदनच्या टीम बऱ्याच आधी पोहोचल्या होत्या. त्यांच्या आधी सुधीरच्या टीम ने स्पर्धेची समाप्ती केली होती. निकाल उद्या सकाळी ८ वाजताच समजणार होता आम्ही काही त्यासाठी थांबणार नव्हतो. गाडी जवळ आलो सुमित वाट पाहत होताच म्हंटले जेवलास काय रे त्यावर म्हणाला "मस्त पिठलं भाकरी खाल्ली, कांदाभज्जी पण खाली मी" कपडे बदलून आम्ही निघायच्या तयारीला लागलो पण अजून दीपकच्या टीमचा पत्ता नव्हता. मार्शल्सना विचारले आम्हाला सांगा त्यांनी स्पर्धा सोडलीतर नाही ना!!! पण त्यांनी काहीच उत्तर नाही दिले मग अजून काही वेळ वाट पाहूया असे अजय म्हणाला. आम्ही सगळे पुणेदरवाज्या जवळ थांबून आवाज देत होतो. त्याला प्रतिसाद म्हणून भरतचा आवाज आला आता जीवात जीव आला. इतकावेळ ह्यांचा काहीच मागमूस लागत नव्हता दीपक आणि भरत दोघे भाग्याला मधेच रेस सोडायला देणार नाहीत हे माहित होते पण मधली वाट तितकीशी चांगली नसल्याने जरा मनाला धाकधूक लागून राहिली होती त्यांना मार्गी लावून आम्ही आमच्या गाडीच्या दिशेने निघालो. आता पूर्ण रात्र परतीचा प्रवास करायचा होता. सुमितची झोप झाली होती मागे स्वप्ना आणि अजय ने ताणून दिली. आम्ही थोडे थोडे जागेच होतो गाणी चालू होती. पोटाला मात्र प्रचंड भूक लागली होती. हायवेला गाडी थांबून काही खाऊया असे ठरवले आणि सिंहगडावरून निघालो.
आम्ही सगळे पुणेदरवाज्या जवळ थांबून आवाज देत होतो. त्याला प्रतिसाद म्हणून भरतचा आवाज आला आता जीवात जीव आला. इतकावेळ ह्यांचा काहीच मागमूस लागत नव्हता दीपक आणि भरत दोघे भाग्याला मधेच रेस सोडायला देणार नाहीत हे माहित होते पण मधली वाट तितकीशी चांगली नसल्याने जरा मनाला धाकधूक लागून राहिली होती त्यांना मार्गी लावून आम्ही आमच्या गाडीच्या दिशेने निघालो. आता पूर्ण रात्र परतीचा प्रवास करायचा होता. सुमितची झोप झाली होती मागे स्वप्ना आणि अजय ने ताणून दिली. आम्ही थोडे थोडे जागेच होतो गाणी चालू होती. पोटाला मात्र प्रचंड भूक लागली होती. हायवेला गाडी थांबून काही खाऊया असे ठरवले आणि सिंहगडावरून निघालो. आता एक एक किस्से समोर येत होते. वेळो वेळी जेव्हा केव्हा आता ह्या स्पर्धेचा विषय निघेल हे सगळे किस्से मीठ मसाला लाऊन सांगितले जातीलच. ह्या संपूर्ण रेस बद्दल मी एका लाईन मध्ये बोलू शकतो.
आम्ही सगळे पुणेदरवाज्या जवळ थांबून आवाज देत होतो. त्याला प्रतिसाद म्हणून भरतचा आवाज आला आता जीवात जीव आला. इतकावेळ ह्यांचा काहीच मागमूस लागत नव्हता दीपक आणि भरत दोघे भाग्याला मधेच रेस सोडायला देणार नाहीत हे माहित होते पण मधली वाट तितकीशी चांगली नसल्याने जरा मनाला धाकधूक लागून राहिली होती त्यांना मार्गी लावून आम्ही आमच्या गाडीच्या दिशेने निघालो. आता पूर्ण रात्र परतीचा प्रवास करायचा होता. सुमितची झोप झाली होती मागे स्वप्ना आणि अजय ने ताणून दिली. आम्ही थोडे थोडे जागेच होतो गाणी चालू होती. पोटाला मात्र प्रचंड भूक लागली होती. हायवेला गाडी थांबून काही खाऊया असे ठरवले आणि सिंहगडावरून निघालो. आता एक एक किस्से समोर येत होते. वेळो वेळी जेव्हा केव्हा आता ह्या स्पर्धेचा विषय निघेल हे सगळे किस्से मीठ मसाला लाऊन सांगितले जातीलच. ह्या संपूर्ण रेस बद्दल मी एका लाईन मध्ये बोलू शकतो.
"स्वतःचे पैसे खर्च करून दमल्या बद्दल सगळ्यांचे अभिनंदन"
Approximately finish time for known
Teams
Team Gladiator's: - 4 hrs 50 mnt
Team Dignity: - 5 hrs 20 mnt
Team 3 musketeers: - 5 hrs 30 mnt
Team APS: - आरामात
Team DB^2: - एकदम आरामात
ह्या स्पर्धेचा अनुभव काव्य स्वरुपात मांडण्याचा देखील प्रयत्न केला आहे.
सताड उघडा डोंगर माथा
पसरला हिरवा गालीचा
संथ चालती पाऊसधारा
स्पर्धेचा ह्या सूर निराळा
कात्रज वरुनी सुरवात होता
"टीम" दौडती
वाऱ्यावर साऱ्या
चिखलात माखले कपडे फाटले
सारेच आज जिद्दीला पेटले
एक एक करुनी पार करती
निसरड्या वाटेवर पाऊले
न टिकती
अंधाराचा सुर्य उगवता
कृत्रिम मशालींचा जाळ जाहला
आला प्रवासाचा अंतिम टप्पा
"आवरी" चा तो
निसरडा रस्ता
अटकरवाडीत प्रवेश होता
रौद्र रुपी सिंहगड भासला
इतक्यात कानी आल्या दोस्तांच्या
हाका
पायांना स्फूर्ती देणाऱ्या
ललकाऱ्या
सर्व ताकदीने सिंहगड गाठला
स्पर्धा संपल्याचा बिगुल
जाहला
विलक्षण रोमांचाचा थरार
न्यारा










कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा